About Me

My photo
NASHIK, Maharashtra, India

19 July, 2023

चणकापूरची लढाई

 

हुतात्मा स्मारक

इंग्रज भारतात आले तेव्हा सुरुवातीच्या काळात साम्राज्यविस्तार करतांना अनेक भारतीय राजांवर, लोकांवर दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. इंग्रजांनी अनेक स्थानिक राज्यकर्त्यांच्या हातून सत्ता काबीज केली आणि राज्यातील जनतेकडून जबरदस्तीने करवसुली करणे सुरु केले. लोकांवर अन्याय होऊ लागला. अनेकांच्या मनात संताप खदखदत होता पण क्रूर इंग्रजांविरुद्ध बंड करण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. पण काही शूरवीरांनी मात्र प्राणाची देखील पर्वा केली नाही आणि इंग्रंजांविरुद्ध बंड केले. त्यांपैकींच एक उठाव म्हणजे चणकापूरचा लढा.

सन १९३० मध्ये कळवण तालुक्यातील गिरणा नदीवर बांधण्यात आलेले चणकापूर धरण चणकापूर गावाच्या मधोमध असलेल्या टेकडीवर इंग्रजांविरुद्ध हा लढा घडून आला. चणकापूर पंचक्रोशीतील १० ते १२ हजार आदिवासी बांधव एकत्र झाले. सर्वसामान्य भोळ्याभाबड्या गरीब जनतेवर इंग्रजांनी केलेला अन्याय आणि अत्याचार सहन झाला नाही. सर्वांनी "जिंकू किंवा मरू" असा निर्धार करून हाती भाल्ले, तिरकमठा, आदी हत्यारे घेऊन तसेच मनात इंग्रज राजवटीबद्दलचा पराकोटीचा संताप, त्यात इंग्रजांविरुद्ध लढण्याची जिद्द, अशी सारी स्वातंत्र्यलढ्याची तयारी करून हि इंग्रज विरुद्ध आदिवासी लढाई त्या टेकडीवर घडून आली. या आदिवासी बांधवांच्या बलिदानाला राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासात मोठे महत्व देण्यात आले आहे.

हा आदिवासी बांधवांचा लढा उधळून लावण्यासाठी जुलुमी, अन्यायी इंग्रज सरकारच्या सैन्यांनी संपूर्ण टेकडीला चोहोबाजूंनी वेढा दिला. आदिवासींच्या लढण्याचा ठाम निश्चय बघून या इंग्रज फौजांनी हवेतच गोळीबार सुरु केला. त्याला आदिवासींनी चांगल्याप्रकारे प्रत्युत्तर दिले. हे प्रत्युत्तर देताच ब्रिटिशांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला आणि त्यात कित्येकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, चेंगराचेंगरी झाली, काही आदीवासी बांधवानी कड्यातून उड्या मारून घेतल्या, काहीजण तलावात बुडून मृत्युमुखी पडले,  कित्येकांना या लढ्यात वीरमरण आले. सुमारे दीड दिवस चाललेल्या या तुंबळ लढाईत शंभराहून अधिक आदिवासी बांधव इंग्रजांविरुद्ध लढता-लढता शहीद झाले.

या संग्रामासाठी (उठावासाठी) नेतृत्व करणाऱ्या सहा प्रमुख नेत्यांना ब्रिटीश सरकारने सश्रम कारावासाची शिक्षा केली. ह्या स्वातंत्र्य लढ्यात महिलाही मागे नव्हत्या. जवळजवळ चारशे महिलांना अटक झाली होती. या लढ्यानंतर संपूर्ण आदिवासीबहुल भागात ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढण्याचे रणशिंगच फुंकले गेले. प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढण्याचे धारिष्ट दाखवायला लागले.  स्वातंत्र्यासाठी जीव गमवावा लागला तरी चालेल पण अन्याय सहन करणार नाहीत, असा निर्धार करून पुरुष - महिला ब्रिटिश सरकार विरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या स्वरूपामध्ये स्वातंत्र्यासाठी लढे सुरु झाले. या लढयांद्वारे संपूर्ण देशात ब्रिटीश फौजांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलून आदिवासी बांधव शहीद झाले.

स्वातंत्र्यासाठी ज्या आदिवासी बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ या टेकडीजवळील चणकापूर ग्राम येथे शासनाने हुतात्मा स्मारकाची उभारणी केली आहे. हे हुतात्मा स्मारक सुमारे साडेचार एकर जमिनीवर असून ११९ मीटरचा चबुतरा आहे.  दरवर्षी ऑगस्ट ला क्रांतीदिनानिमित्ताने वीर हुतात्म्यांचे स्मरण होत असते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजारोहण करून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. चणकापूर परिसरातील वातावरण निसर्गरम्य असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना आश्वासक शांततेचा अनुभव देतो.

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या पूर्वजांचा, आदिवासी बांधवांचा हा  ऐतिहासिक वारसा येणाऱ्या पिढीसाठी जपून ठेवावा तो टिकून राहावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा.

Reference by https://zpschoolsaptshrungigad.wordpress.com/

27 November, 2021

हेमाडपंथी शिवमंदिर: मार्कंड पिंपरी

हेमाडपंथी शिवमंदिर

हे पुरातन हेमाडपंथी  शिवमंदिर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात मार्कंड पिंपरी ह्या गावात आहे. मार्कंड पिंपरी हे गाव नाशिकपासून जवळजवळ ६२ किमी दूर आहे आणि कळवण पासून १६ किमी अंतरावर आहे.  हे मंदिर हेमाडपंती शैलीचे आहे आणि गाभाऱ्यात भगवान शिव ची मूर्ती असल्यामुळे ह्या मंदिराला हेमाडपंती शिवमंदिर म्हणून संबोधले जाते. सप्तशृंगी गड आणि मार्कंडे ऋषी गड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर, दुर्मिळ आणि मोडकळीस आलेले हे हेमाडपंथी शिवमंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. स्थानिक लोक, पर्यटक, आणि सरकार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंदिर बहुतांशी उद्ध्वस्त झाले आहे.

असे हेमाडपंथी शैलीचे दोन शिवमंदिर कळवण तालुक्यात पाहायला मिळतात. एक म्हणजे देवळीकराड या गावामध्ये आहे तर दुसरं मार्कंड पिंपरी येथे आहे. कळवण तालुका हा इतिहासपूर्ण तालुका आहे, असे म्हणतात कि, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या लढाईसाठी जात होते तेव्हा ते या शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. या प्राचीन मंदिराच्या दर्शनासाठी जातांना गावाच्या सुरुवातीला एक कमान लागते, त्या कमानीवर मंदिराचे नाव रंगवले आहे त्यामुळे वळण घेणे सोयीस्कर जाते. एक चांगली गोष्ट म्हणजे, ह्या मंदिराच्या दर्शनासाठी वाहनाने जाऊ शकता. 


हे शिवमंदिर मार्कंड पिंपरी गावाच्या पश्चिम दिशेला आहे. तसेच हे  मंदिर हेमाडपंथी शैलीत बनवले आहे. सर्वांत समोरची भिंत आणि छप्पर खूप खराब झालेले आहे परंतु गाभारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे.  शिवलिंग देखील सुंदर आहे आणि मंदिराच्या मागील बाजूस एक लहान आकाराचे छिद्र आहे. तेथील स्थानिक लोक म्हणतात कि, छिद्रामध्ये पाण्याचा स्त्रोत आहे आणि ते कधीही बंद होत नाही. तेथील स्थानिक लोक, भक्त आणि पर्यटक शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी त्या पाण्याचा वापर करतात. 

काही वर्षांपूर्वी या मंदिरात एक संत राहत होते, ते मंदिराची सर्व देखभाल करत होते. हे मंदिर सर्वांसाठी खुले असते. या मंदिराचा परिसर अतिशय नैसर्गिक आहे आणि खूप सुंदर आहे. बेसाल्ट खडकात अनेक छोटी-छोटी शिल्पे कोरलेली आहेत, जसे कि, शिव-पार्वती, गणेश इत्यादी. खांबांची रचना साध्या पद्धतीची आहे, छत मोठ्या दगडांनी बनलेले आहे, काही दगड पडले आहेत. ध्यानधारणा करणाऱ्या लोकांना या ठिकाणी इतकी गर्दी करू दिली जात नाही. मुख्य मंदिराच्या परिसरात अजून एक छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या आवारातून मार्कंडेश्वर पर्वत आणि सप्तशृंगी गडाचं मनमोहक रूप दिसतं. या शिव मंदिरापासून जवळच एक पाझर तलाव बांधला आहे. 

आपण खूप भाग्यवान आहोत कि, या इतिहासकालीन पुरातन वास्तूंचा वारसा निसर्गाने आपल्याकडे ठेवा म्हणून दिला आहे. अशा या इतिहासकालीन पुरातन वास्तू जपल्या पाहिजेत, त्यांचं संगोपन केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व पिढ्यांना ह्या पुरातन वास्तूंचा इतिहास माहिती झाला पाहिजे, नाहीतर काळाच्या ओघात हे सर्व त्यांच्या इतिहासासोबतच  नामशेष होऊन जाईल. 

22 August, 2021

वास्तुवैभवाने नटलेला किल्ला: चौल्हेर



चौल्हेर किल्ला


चौल्हेर हा किल्ला देखणा आहे. भक्कम आणि वास्तुवैभवाने नटलेला आहे. नाशिकहून सटाणा, सटाण्याहून तिळवण येथे गेल्यानंतर जवळच वाडी-चौल्हेर हे पायथ्याचे गाव लागते. किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला अशा विविध नावांनी हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यावर पिठुरी अमावस्येला जत्रा भरते.

हा किल्ला अपवादानंच पाहिला जातो. बर्‍यापैकी चढाई असणारा हा गिरीदुर्ग इतिहासात एवढा ज्ञात नसला तरी त्यावरील उत्कृष्ट स्थापतने म्हणजे प्रवेशद्वारांची ओळख लाभलेले हे दुर्गरत्न सरोवरच भटक्यांच्या यादीत नसणं हे खेदजनक म्हणावं लागेल.

गडावर शिरतांनाच एक भुयारी दरवाजांची रांगची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी ३ दरवाज्यातून आत जावे लागते. हे दरवाजे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच होय. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर पाण्याचे एक मोठे तळे आहे. तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फेरफटका मारुन बालेकिल्याची वाट धरावी. 

बालेकिल्ल्याला जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी वाटा आहेत. उजवीकडच्या वाटेने १० मिनिटात पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. वाटेत मोतीटाके, आणि अनेक पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. मोती टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. बालेकिल्यावर सुध्दा पाण्याची ४ जोड टाकी आढळतात. याशिवाय पडक्या वाड्यांचे काही अवशेष आहेत. बालेकिल्यावरुन संपूर्ण गडाचा घेरा लक्षात येतो. गडावरुन सातमाळ रांग व सेलबारी - डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते. बालेकिल्याकडे जाणार्‍या डावीकडच्या वाटेवर चौरंगनाथाची व हनुमाना्ची मुर्ती आहे.

वाडी चौल्हेर गावाच्या मागे चौल्हेर किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या पार कराव्या लागतात. गावा जवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे. या टेकडीवर चढून जाण्यास १० मिनिटे लागतात. या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांतीस्थान बांधलेली आहेत. या टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाहूने वळसा घालून एक ठळक पायवाट जाते. दरी उजवीकडे आणि डोंगर डावीकडे ठेवत या पायवाटेने २० मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगरा समोरील छोट्याशा पठारावर पोहोचतो. येथून समोरच किल्ल्याचा बुरुज दिसतो. 

पठारावरुन वाट खाली उतरते आणि किल्ल्याच्या डोंगराला लागते. वाट संपल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. त्या पायर्‍या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या खाली पोहोचतो. प्रवेशद्वाराकडे जाणार्‍या कातळात कोरलेल्या पायर्‍यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. काही पायर्‍या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फ़ारसा प्रकाश येणार नाही.

या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. ह्या दरवाजा समोरुन गड माथ्यावर जाणारी वाट लागते. तर उजव्या बाजूला पिंड, नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्या खाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरुन हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो.

गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक पत्र्याची शेड लागते. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फ़ेरी मारता येते. शेडच्या पुढे एक सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदीर आहे. त्यात हनुमानाची मुर्ती आणि इतर झिजलेल्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर गड माथ्याच्या कातळटोपी खाली पाण्यचे प्रचंड मोठे टाके आहे.

01 August, 2021

निऱ्हळ (निलंगा) डोंगर


निऱ्हळ (निलंगा) डोंगर





निलंगा गड हे दळवट पंचक्रोशीतील दरेगाव (हा.) ता. कळवण येथे आहे. कळवण तालुका परिसरातील राजागड येथे राजमावली देव कंसरा स्थायिक झाली असे मानले जाते. रायकनड निऱ्हळ डोंगर येथे नीळप (निलंगादेवी) हिने तिचा पती टाफरा याला पकडले. टाफरा हा मांडव, शेंदवड गड, इत्यादी गड खोदत खोदत धुळे, नंदुरबार भागातून कळवण भागात रायकनड येथे आला. त्याला शोधत शोधत निळप या डोंगरावर आली व तेथे तिला टाफरा सापडला. म्हणून या डोंगराला निऱ्हळ (निलंगा) देवीचे डोंगर म्हणतात. हा संपूर्ण परिसर आदिवासीबहूल भाग आहे. या डोंगराच्या सभोवती बरेच गावे आहेत, पूर्वेला कोसुर्डे, कनाशी, पश्चिमेला साजोळे, बोरगांव, हतगड, दक्षिण बाजूस लिंगामे, आमदर, वडाळे, देवळीकऱ्हाड, तसेच उत्तरेस दळवट, दरेगाव, ततानी, जिरवाडे, इत्यादी. हा डोंगर चहुबाजूने झाडाझुडपाने वेढलेला आहे. सर्वांत जास्त जंगल हे ततानी, दरेगाव आणि कोसुर्डे गावाच्या बाजूने आहे. यात साग, सादडा, बेहडा, मोहू, जांभूळ, आवळा, इत्यादी प्रकारचे झाडे आहेत.  या जंगलात वाघ, रानडुक्कर, ससे, मुंगूस, इ. प्राणी आढळतात. अगदी  डोंगराच्या टोकावर एक देवीचे मंदिर आहे. तसेच एक पाण्याचा कुंड आहे यात वर्षभर पाणी भरलेले असतं. डोंगराच्या दक्षिण बाजूस एक मोठी गुहा आहे. यात गिधाड पक्षी राहतात. उत्तरेस एक छोटीशी गुहा आहे आणि त्यात खडकाला एक देवीची मूर्ती कोरलेली आहे.       

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Nirhal (Nilanga) mountain

Nilanga Gad is located in Dalwat Panchkrushi, Daregaon (Ha.) Taluka Kalwan. The report is here believed that Rajmavali Dev Kansara settled at Rajagad in Kalwan taluka. Neelap (Nilangadevi) caught her husband Tafra at Nirhal Dongar in Raikand. Tafra came to Raikand from Kalwan area from Dhule, Nandurbar area while digging Mandav, Shendwad fort, etc. Searching for him, Nilap came to the hill and found Tafra there. Hence this mountain is called the mountain of Goddess Nirhal (Nilanga).

The whole area is a tribal area. There are many villages around this hill, Kosurde, Kanashi to the east, Sajole, Borgaon, Hatgad to the west, Lingame, Amdar, Wadale, Devlikarhad to the south, Dalwat, Daregaon, Tatani, Jirwade, etc. to the north. The hill is surrounded by bushes. Most of the forest is near Tatani, Daregaon and Kosurde villages. It has Teak, Saadda, Behda, Mohu, Purple, Avla, etc. In this forest, Tigers, Wild boars, Rabbits, Mongooses, etc. animals are found.

There is a temple of a goddess at the very top of the hill. There is also a water tank which is filled with water throughout the year. On the south side of the mountain is a large cave. It is home to vultures. To the north is a small cave with an idol of a goddess carved in the rock.

28 June, 2021

त्र्यंबक रांगेतील: भास्करगड उर्फ बसगड किल्ला

भास्करगड उर्फ बसगड 

भास्करगड उर्फ बसगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे.

नाशिक जिल्ह्यात सेलबारी-डोलबारी, अजंठा-सातमाळ, त्र्यंबक यातील नाशिकच्या पूर्वेस व इगतपुरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबकडोंगर रांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसून येतात. याच त्र्यंबकरांगेत येणारा भास्करगड किंवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी आहे.

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अंजनेरी  हे किल्ले येतात.

निरगुडपाडा हे हरिहर व भास्करगड या दोन्ही गडाच्या पायथ्याचे गांव आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरुन घोटी मार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि. मी. आहे तर नाशिक- निरगुडपाडा हे अंतर त्र्यंबकमार्गे ४१ कि. मी. आहे. निरगुडपाडयाच्या समोरील बाजूस हरिहर किल्ला तर गावाच्या डाव्या बाजूला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड किल्ला आहे. या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तिनही ठिकाणी निरगुड पाडा येथून जाता येते.

भास्करगडाचा माथा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कातळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्‍या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडलं गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. 

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तीर्ण अशा पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाकी, साचपाण्याचा तलाव त्याच्या काठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

निमूळते पण प्रशस्त पठार असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३३४० फुट उंचीवर पूर्व-पश्चिम पसरलेला असून किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३२ एकर आहे. गडाचा माथा हा निव्वळ खडकच असल्याने आपल्याला सर्वत्र दगड पसरलेले दिसतात. पठारावर जाताना वाटेत उजव्या बाजूला एका वास्तुचे अवशेष असून त्यात काही कोरीव दगड दिसून येतात. पठारावर आपण जेथे पोहचतो तेथे पाण्याचे एक बुजलेले जोडटाके असून या टाक्यासमोर एक मोठ्या वास्तुचे अवशेष दिसून येतात. या पठारावरुन आपण गडाखालून वर येताना जो बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाण्याची दोन कोरडी टाकी दिसून येतात.

गडावर काही या टाक्याच्याखाली टोकाला असलेल्या बुरुजाला काही प्रमाणात तटबंदी असून बुरजावर जाण्यासाठी असलेला दरवाजा उध्वस्त झालेला आहे. किल्ल्याला या भागात काही प्रमाणात रचीव तटबंदी दिसून येते. पुढे आपल्याला एका मोठ्या वाडयाच्या भिंतीचे अवशेष दिसून येतात. या वाडयावरुन पुढे गेल्यावर एक साचपाण्याचा तलाव दिसून येतो. या तलावातच खडकात एक टाके खोदलेले आहे. तलावाच्या काठावर असलेल्या चार उध्वस्त भिंतीच्या आत एक टाके शेंदुर फासलेली हनुमानाची मूर्ती आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
In Trimbak Range: Bhaskargad aka Basgad Fort

Bhaskargad or Basgad fort is located in Nashik district in the state of Maharashtra.

Bhaskargad, Harshgad, Trimbakgad, Anjaneri, Ranjangiri, Gadgada, Bahula forts can be seen in the Trimbakdongar range which spreads east of Nashik and south of Igatpuri between Selbari-Dolbari, Ajanta-Satmal, Trimbak in Nashik district. Bhaskargad or Basgad, which falls in the same Trimbak rang is a close neighbor of Harihar fort.

To the west of Nashik district and to the north of Igatpuri is a mountain range, also known as "Trimbak Range". This queue is divided into two parts. In the first phase, Basgad and Harihar forts are located, while in the second phase, Bramhagiri and Anjaneri forts are located.

Nirgudpada is a village at the foot of both Harihar and Bhaskargad forts. The distance from Mumbai to Nashik highway via Ghoti to Nirgudpada is about 170 km. The distance between Nashik and Nirgudpada is 41 km via Trimbak.  In front of Nirgudpada is Harihar fort and on the left side of the village is Basgad fort which looks like a hat on the head. Between these two forts is a mountain with a serpent-like peak. Harihar, Basgad and Fani Dongar are the three places that can be reached from Nirgudpada.

The head of Bhaskargad is made of basalt rock. The main attraction of the fort is the spiral staircase carved into the rock. Stairs with uneven steps have 10 feet high ramparts on either side. The staircase leads you to the west entrance. The entrance is buried in the ground up to the arch of the arch. You have to crawl through the entrance to enter the fort.

Upon entering the fort through the entrance, two such forks split in front and on the right. Both these parts go to the plateau of the fort. But after walking for 10 minutes on the right footpath, we reach the vast plateau of the fort. On the plateau of the fort, you can see the remains of fallen structures, temples, a burnt tank, a lake of water and a Hanuman carved in the rock.

With a steep but wide plateau, the fort stretches from east to west at an altitude of 3340 feet above sea level and covers an area of ​​about 32 acres. Since the top of the fort is a pure rock, you can see stones scattered everywhere. On the way to the plateau, on the right side of the road, there are the remains of a building with some carved stones. Wherever we reach the plateau, there is a fading water tank and the remains of a large structure can be seen in front of this tank. From this plateau, on the way to the bastion that you can see coming down from the fort, you can see two dry tanks of water on the way.

The bastion at the end of this tank is fortified to some extent and the door leading to the bastion has been demolished. The fort has some fortified ramparts in this area. Next we see the remains of a large castle wall. Going further from this fort, you can see a lake of water. A pond has been dug in the rock in this lake. Inside the four crumbling walls on the edge of the lake is a statue of Hanuman with a torn shendur.

27 March, 2021

अलंग किल्ला


अलंग, मदन व कुलंग किल्ला

अलंग किल्ला किंवा अलंगगड हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक आहे. अलंग किल्ला पश्चिम घाटाच्या कळसुबाई परिसरामध्ये योग्यरित्या वसलेला आहे. ह्या किल्याला दाट जंगलाने वेढलेले आहे. 

या कळसूबाई परिसरात जवळजवळ तीन किल्ले वसलेले आहेत. पश्चिम घाटातील कळसूबाई परिक्षेत्रातील या तीन किल्ल्यांपैकी एक म्हणजे मदनगड व दूसरा कुलंग. नाशिक जिल्ह्यातील या दोन किल्ल्यांवर पोहोचणे सर्वात अवघड ते म्हणजे मदनगड आणि कुलंग. येथे या पर्यटनस्थळाला लोक हॉलिडेसाठी भेट देतात.

अलंग किल्ला इतर किल्ल्यांच्या तुलनेने लहान आणि छोटीसी पठार आहे. गडावर एक गुहा व दोन पाण्याचे कुंड आहेत. गडावर काहीही मानवनिर्मित वास्तू नाहीत. या किल्ल्याच्या पूर्वेस कळसुबाई, औंढा किल्ला, पट्टा आणि बिटानगड आहेत; उत्तरेस हरिहर, त्र्यंबकगड आणि अंजनेरी; हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा (शिखर), रतनगड आणि दक्षिणेस कात्रबाई आणि पश्चिमेस कुलंग.

अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी / कसारा-घोटी-पिंपळनेरमोर मार्गाने कसारा किंवा इगतपुरी आणि नंतर आंबेवाडीला जाता येते. घोटी ते आंबेवडी अशी बस सेवा आहे. घोटीपासून २ किमी अंतरावर आंबेवाडी आहे. घोटी ते आंबेवाडीला सकाळी बस सेवा उपलब्ध असते. तेथून अलंग, मदन आणि कुलंग सहजपणे आपण पाहू शकतो. आंबेवाडीहून, अलंग ते मदन दरम्यानच्या वाटेवर जाण्यासाठी 2 तास लागू शकतात. कड्यातून डाव्या बाजूस दिसणारा किल्ला अलंग आहे, तर उजव्या बाजूला मदन आहे. 

-------------------------------------------------------------------Alang fort

Alang Fort or Alanggad is a fort in Nashik district of Maharashtra. This fort is one of the most difficult forts. Alang Fort is well situated in the Kalsubai area of ​​the Western Ghats. The fort is surrounded by dense forest.

There are about three forts in this Kalsubai area. Madangad and Kulang are one of the three forts in the Kalsubai range in the Western Ghats. The most difficult to reach these two forts in Nashik district are Madangad and Kulang. Here people visit this tourist spot for holidays.

Alang fort is a small plateau compared to other forts. There is a cave and two water tanks on the fort. There are no man-made structures on the fort. To the east of this fort are Kalsubai, Aundha fort, Patta and Bitangad; Harihar, Trimbakgad and Anjaneri to the north; Harishchandragad, Ajobagad, Khutta (peak), Ratangad and Katrabai to the south and Kulang to the west.

To reach Alang fort, one can take Igatpuri / Kasara-Ghoti-Pimpalnermore route to Kasara or Igatpuri and then to Ambewadi. There is a bus service from Ghoti to Ambewadi. Ambewadi is at a distance of 2 km from Ghoti. Morning bus service is available from Ghoti to Ambewadi. From there we can easily see Alang, Madan and Kulang. From Ambewadi, the journey from Alang to Madan can take up to 2 hours. The fort seen on the left side of the fort is Alang, while Madan is on the right side.

18 February, 2021

'न भूतो न भविष्यति' असा 'जाणता राजा': छत्रपती शिवाजी महाराज



छत्रपती शिवाजी महाराज


महाराष्ट्राची भूमी ही उज्ज्वल अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक अणि सामाजिक परंपरा सांगणाऱ्या भूमीपुत्रांची खाण आहे. सह्याद्री-सातपुडयांच्या रांगांनी, पवित्र अशा महानद्यांनी आणि दुर्गम अशा गडकोटांनी बनलेल्या महाराष्ट्रातील लोकांच्या अंगी कर्तृत्व, धैर्य, शौर्य अणि शांती सहज दिसून येते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा, संत जनाबाई. अशा अनेक संतानी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीची जडणघडण केली आहे. तसाच एक रयतेचा राजा होऊन गेला त्याचे नाव होते शिवाजी. 

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवंत राजा होता. जगातील थोर पराक्रमी आणि मुत्सद्दी राजांची यादी जर समोर धरली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा मोहरा सापडणे दुर्मिळ आहे. नेपोलियन बोनापार्ट, सिकंदर, किंवा दुसरे कोणतेही नृपती उदाहरणार्थ घेतले तरी प्रत्येक नृपतीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज कांकणभर अधिक आहेत आणि हे शतप्रतिशत कबूल करावेच लागते. 

त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली. अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची अचूक पारख होती. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, सहकारी, सेनाधिकारी अशी कितीतरी माणसे त्यांनी पारखुनच आपल्या जवळ केली होती. महाराजांनी सतत सज्जन व्यक्ती, आपले सेनानी, स्त्रिया, संत-महंत यांचा सन्मान केला त्यांना सन्मानाची वागणूक देऊन राज्यव्यवस्थेत योग्य ते स्थानही दिले. शिवाजी महाराजांच्या लष्कराच्या पाठीचा कणा होता, तो म्हणजे लष्करात कुणबी, मराठे, ब्राह्मण, मुसलमान, न्हावी, महार, कोळी, भंडारी, रामोशी, धनगर, वैगेरे ५६ जातीचे लोक होते. शिवरायांचे सैन्य राष्ट्रीय होते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील सर्व जातीतील गुणवंतांना शिवरायांच्या सैन्यात प्रवेश मिळे. माणसांची पारख करूनच त्यांचा सैन्यात समावेश केला जाई. 

अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या हिंदू धर्माचे रक्षण केले मात्र ते करत असताना महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे. शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षण करुन, रयतेत आत्मविश्वास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असताना मुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्‍या अर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करात विविध पदांवर ७०० हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे ते म्हणत. 

महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता, “वेग”. तूफान वेग आणि त्यात हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती. म्हणून महाराजांनी युद्धात हत्ती वापरले नाहीत. सर्व दुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन वाट चोखाळली आणि हत्ती हा प्राणी आणि त्याच्या चाली महाराजांनी गनिमीकावा या युद्धपद्धतीतून वगळून टाकल्या. हेच ते महाराजांचे वेगळेपण. “जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही अन् जे महाराजांनी केले, ते जगाला कधीच करता आले नाही.” म्हणून जगाला महाराजांसमोर कायम वाकावे लागते. 

शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असे. शहाजी राजाची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका, विशाल गडावरच्या चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते. 

आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबध्द अविरत श्रमाने त्यांनी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. कौशल्य, चातुर्य अणि साहस या गुणांनी त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक शक्ती स्वराज्य स्थापण्यासाठी एकत्रित केल्या त्यामुळे ते आपल्या काळातील युगप्रवर्तक ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारीत्र्य साधेपणा, कनवाळूपणा, स्त्रियांबद्दल असणारा भक्तीभाव, त्यांची धार्मिक वृत्ती यामुळे महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेमध्ये महाराज अवतारी पुरुष असल्याची भावना निर्माण झाली होती कारण महाराजासारखा धर्मनिरेपक्ष राजा या देशात झालाच नाही. 

‘सैन्यावाचून राज्य धन अणि पराक्रम प्राप्त होत नाही’ महाराजांनी आपल्या लष्कराची आणि आरमाराची उभारणी हे सुत्र डोळ्यासमोर ठेवूनच केली. आपल्या मुलखात शांतता प्रस्थापित करणे, जनतेला नि:पक्षपाती न्यायदान करणे, महसूल पध्दतीत सुसुत्रता आणणे, शेतकरी व शेतीला उत्तेजन देणे, आपल्या मुलखाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सैन्यदल उभारणे, किनारपट्टीवर पहारा करण्यासाठी आणि व्यापारासाठी आरमार उभारणे अशी विविध प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्षम आणि कारभाराची वैशिष्टये होती. 

स्त्री ही कुठलीही असो, प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला. शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एक चारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मान करणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता. 

शिवाजी महाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला 'शाप' ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार. स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत होते. महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते. 

विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रुपात पाहत होती. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते. 

छत्रपती शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते. राजेंबद्दलचा मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो. जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ह्या जनतेचं त्याच्याबद्दलच प्रेम बघून भारावून गेले असते. पण त्याचबरोबर देशात चाललेल्या भ्रष्टाचार, गुन्हे, दंगली बघून उदास हि झाले असते. अशा ह्या थोर राज्याला माझं शत शत नमन. 

15 February, 2021

प्राचीन टेकडी किल्ला: आड


आड किल्ला


आड किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. हा किल्ला फारच छोटा आहे किल्ल्याची उंची जवळजवळ ४०४६ फूट आहे. आडवाडीच्या बेस गावातून आड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पायी जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागतो. हा प्राचीन टेकडी किल्ला मुख्यतः सिन्नर आणि इगतपुरी दरम्यानच्या भागात टेहळणी बुरूजासाठी वापरला जात असे. हा किल्ला पहिल्या शतकाच्या सुरूवातीस बांधण्यात आला होता, असा स्थानिकांचा विश्वास आहे. शिखरावर जाण्यासाठी मार्ग आहेत. एक माधली आडवाडीची असून ती सोपी पण लांब आहे. दुसरा वरची आडवाडीचा असून तो इतरांपेक्षा खंबीर पण खात्रीने आहे आणि १५ मिनिटे घेते. पट्टा, औंढा, डुबरगड, सोनगड, पर्वतगड, कळसूबाई शिखर इत्यादी किल्ले यावरुन पाहिले जाऊ शकतात.

गडाचा माथा रुंद पठार असून त्यावर सुमारे तीन पाण्याच्या टाक्या आहेत. गडावर काही जुन्या वास्तूही आहेत. या किल्ल्याचे वय जवळजवळ २२०० वर्षे आहे, असे वयोवृद्ध पाण्याच्या टाक्यांवरून आपण अंदाज लावू शकतो. गडावर पाण्याच्या टाकीच्या आत एक विचित्र शरभ शिल्प आहे. पूर्वेकडच्या खालच्या बाजूला एक गुहा पाण्याची टाकी आहे. सध्या बरीच पवन ऊर्जा कंपन्यांनी लगतच्या भागात पवनचक्की बसविली आहेत.

पश्चिमेस हनुमानाचे मंदिर आहे. या बाजुला किल्ल्याची पायरी चढण्याचा मार्ग आहे. आड उंच उभे आहे आणि त्याचा उत्तर-पश्चिम दिशेने अनुलंब दगड दर्शवित आहे. पायथ्यापासून किल्ल्याकडे पाहिले तर पांढऱ्या रंगाचा ठिपका दिसत आहे, ती एक गुहा आहे. या गुहेत, जगदंबा देवीची मूर्ती आहे. या गुहेला लागून असलेली आणखी एक उत्खनन केलेली गुहा आहे. ही गुहा निवासस्थानासाठी वापरली जाऊ शकते. गुहेच्या बाहेर पाण्याची टाकी आहे जी जवळजवळ जमिनीत पुरली गेली आहे. उत्तरेकडे जाताना काही पायऱ्या चढून वरच्या बाजूस पठारावर येते. या किल्ल्यावर सुमारे १५ टाक्या आहेत.

गडाच्या माथ्यावर चालत असताना काही ठिकाणी अवशेषांमधील वास्तू दिसू शकतात. या अवशेषांपैकी एकाकडे दगडी शिल्प आहे आणि ती परिधान करुन फाडल्यामुळे मूर्ती ओळखता येत नाही. या मूर्तीच्या समोर झूमरसारखा मोठा दगडी दिवा आहे. गडाच्या वरच्या भागावर दोन किल्ल्यांचे अवशेष आहेत, त्यातील एक समाधी आहे. गडाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या दुसर्या इमारतीचे अवशेष दिसतात. गडाच्या उत्तरेस कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. तथापि केवळ या दाराची चौकट उभी आहे आणि कमानाचे पडलेले दगड आजूबाजूला दिसू शकतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Ancient Hill Fort: Aad
Aad fort is located in Nashik district of Maharashtra. This fort is very small. The height of the fort is about 4046 feet. It takes about half an hour to walk from the base village of Aadwadi to the base of Aad fort. This ancient hill fort was mainly used as a watchtower in the area between Sinnar and Igatpuri. The fort is believed to have been built at the beginning of the first century. There are 2 ways to reach the top. There is a middle bar and it is simple but long. The second one is from the upper side and it is stronger than the others but it takes 15 minutes. Forts like Patta, Aundha, Dubargad, Songad, Parvatgad, Kalsubai Shikhar etc. can be seen from here.

The top of the fort is a wide plateau with about three water tanks. There are also some old structures on the fort. The age of this fort is about 2200 years, we can guess from the aged water tanks. Inside the water tank on the fort is a strange Sharabh sculpture. On the lower east side there is a cave and a water tank. Currently, many wind power companies have installed windmills in nearby areas.

To the west is the temple of Hanuman. On this side is the way to climb the steps of the fort. The side stands high and shows its vertical stone in a north-westerly direction. If you look at the fort from the base, you can see a white spot, it is a cave. In this cave, there is an idol of Goddess Jagdamba. Adjacent to this cave is another excavated cave. This cave can be used for habitat. Outside the cave is a water tank that is almost buried in the ground. Going north, you climb a few steps and reach the plateau at the top. There are about 15 tanks on this fort.

Remains can be seen in some places while walking on the top of the fort. One of these relics has a stone sculpture and the idol cannot be identified as it has been torn down. In front of this idol is a large stone lamp like a chandelier. At the top of the fort are the remains of two forts, one of which is a samadhi. To the west of the fort are the remains of another walled building. To the north of the fort are the remains of the Konkan Gate. However only the frame of this door is vertical and the fallen stones of the arch can be seen all around.



25 November, 2020

पराक्रमाचा शिलेदार: रामशेज किल्ला

 


 

नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे.  संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महानही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड. तो तेथून आठ कोस अंतरावर आहे.

रामशेजया शब्दाचा अर्थरामाची शय्याअसा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे अशी लोकभावना. म्हणून  प्राचीन काळापासूनच या डोंगराला किल्ल्यालाहीरामशेजहे नाव मिळाले आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रामशेज किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे. रामशेज किल्ला नाशिक-पेठ रस्त्यालगत उभा आहे. पेठ रस्त्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरूनपेठकडे जाणारी एस.टी. आशेवाडी गावाच्या फाट्यावर थांबते. तेथे उतरून आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्ल्यावर चढाई करता येते.

पेठकडे जाणाऱ्या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. नाशिकच्या निमाणीजवळील पेठ नाका येथूनही खासगी वाहनांची सोय आहे. रस्त्यावर उतरल्यावरच रामशेजच्या टुमदार किल्ल्याचे दर्शन होते. आशेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यास ४५ मिनिटे लागतात.

समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३२७० मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो. वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसर न्याहाळता येतो.

गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायऱ्या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो.

गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

गुहेच्या समोरून जाणाऱ्या पायऱ्या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते.

गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसऱ्या टोकाकडे जाते डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायऱ्या दिसून येतात. एका कड्यावर या पायऱ्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य बुरूजावर उभारलेला ध्वजस्तं दिसतो. तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मदिनी मोठा उत्स साजरा केला जातो.

या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.

किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो.

मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसऱ्या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो.

समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती पिंडीचे अवशेष दिसून येतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Ramshej fort

This fort near Nashik is on a flat and open ground. This fort can be seen from all over Nashik. Ramshej is a fort that makes sense of the saying 'idols are small but fame is great'. The only fort near Ramshej fort is Trimbakgad. It is eight kos away from there.

The word 'Ramshej' means 'bed of Rama'. While in exile, Lord Shriram had stayed on this mountain for a few days. Lord Shriram used to rest at this fort and there is a feeling that he has a bed there. Therefore, this hill and the fort have been given the name 'Ramshej' since ancient times.

Ramshej fort is at a distance of 15 km from the central bus stand of Nashik. Ramshej fort stands near Nashik-Peth road. There is a village called Ashewadi at a distance of half an hour from Peth Road. Ashewadi is a village at the foot of Ramshej. From CBS bus stand in Nashik to ‘Peth’ bus. Ashewadi stops at the village fork. After landing there, we reached Ashewadi village, where we can climb Ramshej fort.

Buses going to Peth take a detour to this fort. Private vehicles are also available from Peth Naka near Nimani in Nashik. On the way down, you can see the beautiful fort of Ramshej. It takes 45 minutes to reach the top of the fort from Ashewadi village.

The fort is 3270 meters above sea level. But as it is not higher than the actual base, the fort is visible in any season. The surroundings are clear so you can see the surrounding area.

On the way out of the village, one can see the main fort. The flagpole is erected here. If you take a detour and go a little further, you will take steps. These steps are made of modern cement. As you ascend the steps, you come to the notice of Ramshej fort. The area around the forts at both ends of the fort is visible.

On the way to the fort, there is a cave. There is a temple of Rama in this cave. It also shows an inscription carved on one side. A water tank is visible at the bottom of the cave. In the rainy season it fills up completely. The water in it is drinkable.

The steps leading to the front of the cave lead directly to the top of the fort. We reach the area between the two ends of the fort. This part is too narrow. There is a secret door in front of the door. If you go down this road, you can see the fort of Deher in front. Long distance traffic on Peth Road can be seen from here.

The path leading up to the secret gate leads to the other end of the Ramshej and the path to the left leads directly to the fort's machi, of course, to the main bastion. Going a little further along the path on the right, you can see some steps. These steps are designed on a ring. The main gate of the fort is visible in front. After seeing the door and coming to the main road, you can see the flagpole erected on the main bastion of the fort. There is a big celebration on the birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj.

This place has a steep slope. Below is the village of Ashewadi. About four to five km. In the distance, a mountain of Chamar caves can be seen. Beyond that, a mountain of Pandavaleni can be seen in the distance. If the atmosphere is clear, the mountains of Anjaneri and Brahmagiri can be seen in the distance on the right side.

To reach the other end of the fort, one has to turn back from Machi. The area around this end is higher than before. After climbing a little, we reach a level. There are two water tanks and a pond. If you walk a little further from the lake, you will see the temple of a goddess. It is evident from the footprints that devotees should come and go here constantly. A big festival is also held here on Navratri.

The descent back to the back of the temple. The second secret gate of the fort is at this place. Two water tanks are also visible at the other end. Remains of many dilapidated houses are scattered on this hill. At the back is a large sloping plateau. If you turn it, you will notice the perimeter of this end of the fort.

Bhorgad used for surveillance can be seen in front. The complete view of Nashik-Peth road was from this area. To the right of this point are some broken idols and the remains of a Ingot.

Nature

चणकापूरची लढाई

  हुतात्मा   स्मारक इंग्रज भारतात आले तेव्हा सुरुवातीच्या काळात साम्राज्यविस्तार करतांना अनेक भारतीय राजांवर , लोकांवर दडपशाहीचे ...

Historical Place